Uncategorized

काखेला कळसा, गावाला वळसा’-सातारा बसस्थानकाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप

२ वर्षांपासून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांच्या खिशाला ७ ते ८ रुपये अधिकचा भार स्वच्छता आणि सुविधांचा अभाव.

‘काखेला कळसा, गावाला वळसा’-सातारा बसस्थानकाच्या कारभारावर प्रवाशांचा संताप

`२ वर्षांपासून चुकीच्या मार्गाने बस फिरवून प्रवाशांच्या खिशाला ७ ते ८ रुपये अधिकचा भार स्वच्छता आणि सुविधांचा अभाव.

कुसुंबी / प्रतिनिधी : जितीन वेंदे

जिल्ह्याचे प्रमुख आणि लाखो प्रवाशांचे माहेरघर असलेले *सातारा बसस्थानक* सध्या गैरव्यवस्थेचे माहेरघर बनले आहे. स्वच्छतेचा अभाव, अपुरी पाणी व्यवस्था आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गेली २ वर्षांपासून प्रवाशांकडून चुकीच्या पद्धतीने घेतले जाणारे अतिरिक्त भाडे यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

*प्रवाशांची प्रमुख तक्रार काय आहे?*
पूर्वी बसस्थानकाला २ प्रवेशद्वार होते – एक प्रवेशासाठी आणि एक बाहेर पडण्यासाठी. मात्र गेली २ वर्ष बाहेर पडणारे प्रवेशद्वार केवळ बाहेर पडण्यासाठीच वापरले जात आहे. ते कधी खुले होणार.

मेढा-वाई-महाबळेश्वर* कडे जाणाऱ्या एसटी बसेसना बसस्थानकातून बाहेर पडून पवईनाका – पोस्ट ऑफिस असा “गावाला वळसा” घालावा लागतो. त्यानंतर पुन्हा खालच्या चौकातून वळून मेढा-वाई कडे मार्गस्थ व्हावे लागते.

स्थानकासमोरील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने केलेली ही व्यवस्था प्रवाशांच्या जिवावर बेतली आहे. *सातारा ते मेढा* या मार्गासाठी प्रवाशांकडून प्रति प्रवासी *७ /८ रुपये अधिक* मोजले जात आहेत. गेली २ वर्षे एसटी प्रशासनाने या चुकीच्या मार्गाने प्रवाशांना लाखोंचा चुना लावला आहे.

*स्वच्छतेची अवस्था काय?*
बसस्थानकातील स्वच्छतागृहाची अवस्था विचारूच नका. आजूबाजूने येणारा दुर्गंधीचा वास नाक तोंड दाबूनच सहन करावा लागतो. पाण्याची अपुरी व्यवस्था आहे. स्वच्छता गृह मोफत ठेवण्याचे आश्वासन देऊनही अप्रत्यक्षपणे पैसे घेतले जात असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसही बहुतांश वेळा फलाटावर न लावता कोपऱ्यात लावल्या जातात. त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांची प्रचंड दमछाक होत आहे.

*प्रवाशांची मागणी:*
“इंधन वाचवा” असे सांगणाऱ्या शासनानेच याकडे लक्ष द्यावे. निदान एसटी बससाठी तरी हा रस्ता मोकळा करून द्यावा आणि प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणे थांबवावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

प्रवासी समाजसेवक :-गोपाळ जाधव, जाधव उंबरी

—

*चौकट – प्रवाशांच्या 3 मुख्य समस्या:*
१. *आर्थिक भुर्दंड:* वळसा मार्गामुळे २ वर्षांपासून प्रति प्रवासी ७ते८ रु. अतिरिक्त भाडे
२. *गैरसोय:* वयोवृद्धांना लांब अंतर चालावे लागते, बसेस फलाटावर नाहीत
३. *अस्वच्छता:* स्वच्छतागृहात दुर्गंधी, पाण्याची टंचाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button