Uncategorized

इतिहास घडविण्याच्या दिशेने ‘Top Gear Jaoli Jodi Run’ ची दमदार वाटचाल!  

इतिहास घडविण्याच्या दिशेने ‘Top Gear Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये होणार विक्रमी नोंद

इतिहास घडविण्याच्या दिशेने ‘Top Gear Jaoli Jodi Run’ ची दमदार वाटचाल!

 Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये होणार विक्रमी नोंद

जावळी (सातारा) : जगातील आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘Top Gear Jaoli Jodi Run’ या बहुचर्चित स्पर्धेची यंदा सातवी आवृत्ती २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जावळी अर्थात ‘मिनी महाबळेश्वर’ येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेची Asia Book of Records तसेच India Book of Records मध्ये विक्रमी नोंद होणार असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील धावपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेसाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२६ असून, जास्तीत जास्त धावपटूंनी आपल्या जोडीदारासह, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा मैत्रिणीसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘Top Gear Jaoli Jodi Run’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून नातेसंबंध, विश्वास, समन्वय, आरोग्य आणि एकोप्याचा अनोखा उत्सव आहे. दोन व्यक्तींनी एकत्र धावत पूर्ण करण्याची ही संकल्पना देशातील क्रीडा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे.

🏅 जावळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

या विक्रमी उपक्रमामुळे जावळी तालुक्याची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर क्रीडा, पर्यटन आणि आरोग्य जनजागृतीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

संस्थापक-अध्यक्ष नवनाथ डिगे म्हणाले, “Top Gear Jaoli Jodi Run ही जगातील एकमेव जोडी रन म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये नोंद होणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व धावपटूंनी ३० ऑगस्टपूर्वी नोंदणी करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डायरेक्टर डॉ. सुधीर पवार, सचिव संजय धनवडे, खजिनदार सुहास पाटील यांच्यासह संपूर्ण आयोजक टीम मेहनत घेत आहे.

📅 स्पर्धेची तारीख : २२ नोव्हेंबर २०२६

⏳ नोंदणीची अंतिम तारीख : ३० ऑगस्ट २०२६

📍 स्थळ : जावळी (मिनी महाबळेश्वर), सातारा

❤️ “एक धाव आरोग्यासाठी… जोडी रन कुटुंबासाठी!”

Top Gear Jaoli Jodi Run — जावळीच्या मातीतून विक्रमाच्या दिशेने एक दमदार पाऊल!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button