Uncategorized

लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचा स्तुत्य उपक्रम : मोफत नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट

लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचा स्तुत्य उपक्रम : मोफत नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

एम.जे.न्युज सातारा- प्रतिनिधी- वसंत सिरसाट

नांदेड :दि.3,आंतरराष्ट्रीय संस्था लायन्स इंटरनॅशनल तर्फे सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन तर्फे नांदेड येथील सायन्स कॉलेज येथे मोफत नेत्र तपासणी व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांसह अध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या समाजोउपयोगी शिबिरात 270 विद्यार्थी व 35 सदस्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच मधुमेह तपासणीत 57 HbA1C तपासणी 7 जणांची रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य लक्ष्मण (नाना ) शिंदे, प्राध्यापक व सहकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोठे सहकार्य केले. तसेच अध्यक्ष ला. विश्वजीत राठोड, सचिव ला. शिरीष गीते, कोषाध्यक्ष ला.लक्ष्मण पुपलवाड आणि प्रकल्प संचालक नितीन लाटकर प्रा.विनायक चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


यावेळी उपस्थितांनी लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम राबऊन सर्वसामान्यात आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे व आपले कार्य वाढीस न्यावे असे मत मनोगतात व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button