कंधार, नायगाव तालूक्यातील शिवारात बिबट्याची दहशत वाढली: बिबट्याच्या हल्यात एक नागरिक जखमी: पोलीसांचे सतर्कतेचे आवाहन
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार/जिल्हा प्रतिनिधी

कंधार, नायगाव तालूक्यातील शिवारात बिबट्याची दहशत वाढली: बिबट्याच्या हल्यात एक नागरिक जखमी: पोलीसांचे सतर्कतेचे आवाहन
एम.जे.न्युज सातारा/राजू पवार/जिल्हा प्रतिनिधी

नांदेड दि.1/12/2025.तालुक्यातील काटकंळबा व चिखली शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची चर्चा होताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता वनपालांनी तो बिबट्या नसून हिंस्त्र प्राणी असल्याचे सांगितले.
शनिवारी नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी भागात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करून त्यास जखमी केले. त्याची भीती रविवारीही शेतकऱ्यांना होती. भुकमारी, हाळदा, चिखली, काटकंळबा, मंगनाळी ,परिसरात रविवारी रात्री ८ वाजता बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू झाली. रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकांना पाणी देण्यासाठी काही शेतकरी गेले होते. बिबट्या दिसल्याची माहिती कळताच शेतकरी घरी गेले.
भीतीपोटी शेतकरी शेटरमध्ये बसले
भुकमारी येथील जवळपास २० शेतकरी बिबट्याच्या भीतीपोटी एका शटरमध्ये बसल्याची माहिती ज्ञानेश्वर पाचांळ यांनी दिली. दरम्यान, वनपाल शंकर धोंडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले तो बिबट्या नसून हिंस्त्र प्राणी आहे.तसेच नायगाव तालुक्यातील
कृष्णर MIDC परिसरात श्रीकांत पोपुलवाड या तरुणांवर बिबट्याने शनिवारी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीकांत पोपुलवाड यांच्यावर घुंगराळा येथील डॉ. राठोड यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.
या हल्ल्यात जखमी झालेल्या श्रीकांत पुपुलवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी भेट घेऊन वनपरिक्षेत्रधिकारी श्री. देवकत्ते साहेब यांच्याशी संपर्क करून जखमींची भेट करून दिली. वन विभागीची टिम बिबट्याला पकडण्यासाठी आली असून घुंगराळा, कृष्णर, कहाळा,कोलंबी ,भूकमारी या भागातील नागरिक, शेतकरी,कामगारयांनी सतर्क राहावे. बिबट्या कुठे आढळून आल्यास वनविभागाकडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.नांदेड पोलिस यांनी नागरीकांना सतर्क राहण्यासाठी सुचना केल्या आहेत.



