राजकिय पटलावरील एक समाजाभिमुख व्यक्तीमत्व श्री.एकनाथदादा ओंबळे यांची महामंडळावर वर्णी लागावी
www.mjnewssatara.live

राजकिय पटलावरील एक समाजाभिमुख व्यक्तीमत्व श्री.एकनाथदादा ओंबळे यांची महामंडळावर वर्णी लागावी
कुसुंबी.दि.१९.जावली तालुका ही शुर-विरांची भुमी या तालुक्याला शौर्याची परंपरा आहे. मातीसाठी लढणारे व मातीसाठीच मरणारे बरेच योद्धे या मातीत जन्मले.
कारण स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजलखाना सारख्या सैतानाला याच या मातीत छञपती शिवाजी महाराजांनी गाडले.
ही माती छञपतींच्या मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेली आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्यांबरोबरच आमच्या या तालुक्याला राजकिय,सामाजिक,सास्कृतिक,आध्यात्मिक व शैक्षणिकतेचा वारसा लाभलेला आहे.
प्रत्येक क्षेञात आपल्या कार्य कर्तुत्वाने तालुक्याच नाव उंचावण्याच कार्य अनेक व्यक्तिंनी केले.
सध्याची बदलती परिस्थिती पहाता समाजकारणात राहुन राजकारण करणाऱ्यांची संख्या प्रचंड पण राजकारणात राहुन समाजाकारण करणारे माञ बोटावर मोजण्या इतपतच त्यातीलच एक नाव म्हणजे केडंबे गावचे सुपुञ व शिवसेना सातारा सहसंपर्कमुख श्री.एकनाथदादा ओंबळे.
जावली तालुक्यातील एक आदर्श ,सुसंस्कृत,मितभाषी,हसतमुख स्वभावाच एक दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व.
खरतर माणसाची श्रीमंती ही त्याच्या पैशावरुन ,प्रॉपर्टीवरुन न ठरवली जात नाही तर त्याने जोडलेल्या माणसांवरुनच ठरवली जाते त्यातीलच हे एक मनुष्यधन जोडलेलं एक संयमी व्यक्तिमत्व.
माणुस हा त्याच्या पैशावरुन श्रेष्ठ ठरत नसतो तर तो त्याच्या विचार,आचार व अंगी असलेल्या सदगुणांमुळे श्रेष्ठ ठरतो आणि याच गुणांमुळे श्री.एकनाथदादा ओंबळे हे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
गतकाळात तालुक्यात शिवसेनेचा झंजावात निर्माण करुन तालुक्यात खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेला उर्जितवस्था देण्याच काम श्री.एकनाथदादा ओंबळे यांनी केले.
कारण तालुक्यात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपल्या निडर,रोखठोक व बिंधास्त स्वभावाने आपल्या मुठभर सहकाऱ्यांना घेऊन आपल्या घरादारावर तुळशीपञ ठेऊन तन-मन-धन खर्च करुन तालुक्यात शिवसेनेचा आवाज पुन्हा बुलंद केला व ते कोणीही नाकारु शकत नाही.
राजकिय पक्षाच कार्य करताना हा माणुस राजकारणी कधी दिसलाच नाही.
समाजसेवेच व्रत अंगीकारुन राजकारणात राहुन निव्वळ समाजकारण करणारे हे एकमेव नेतृत्व.
म्हणुनच
या व्यक्तीला राजकिय नेता कमी तर समाजनेता,लोकनेता म्हणुनच ओळखले जाते.
मंध्यतरीच्या काळात महाराष्ट्रात राजकिय घडामोडी घडल्या यावेळी त्यांनी माजी मुख्यमंञी व विद्यमान उपमुख्यमंञी श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना साथ दिली आपल्या मातीतल्या माणसासोबत जाऊन शिवसेना या पक्षाचे सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख झाले.
मुंबईसारख्या ठिकाणी राहुन आपल्या पक्षासाठी ,आपल्या लोकांसाठी व आपल्या मातीसाठी दर दोन दिवसाला गावी जाऊन लोकांच्या सुख दु:खात सामिल व्हायच, पक्ष संघटन वाढवायचं,सामाजिक कार्य करायचं व यातुन राहिलेला वेळ कुटुंबाला द्यायचा.
खरंतर एकनाथदादा ओंबळे यांना शासनाने आरोग्यदुत हाच पुरस्कार दिला पाहिजे कारण आम्ही गेली १२ वर्षापासुन त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावुन काम करत आहोत असा त्यांचा एकही दिवस जात नाही की कोणत्या रुग्णाच्या नातेवाईकाचा त्यांना फोन येत नाही.
दररोज कोणत्या ना कोणत्या रुग्णांचे हॉस्पिटलचे बिल कमी करणे असुद्या,कोणाचे मोफत ऑपरेशन असुद्या,कोणाला मुख्यंमञी सहाय्यता निधी असुद्या अशा प्रकारच्या विविध वैद्यकिय समस्येसाठी रुग्णासांठी देवदुत म्हणुनच उभे असतात व यासाठी त्यांच्या पाठी उभी असलेली श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या रुपी एक महादैवी शक्ती .
यामुऴे आरोग्यसेवेच कार्य त्यांचे अविरतपणे सुरु असते.
आजपर्यंत अनेक रुग्णांचे सुमारे करोडो रुपयांचे बिल वाचववण्याचे कार्य एकनाथदादा ओंबळे यांंनी केले नाही व याचा त्यांनी कधीच बडेजाव पणा,दिखाऊपणा केला नाही जे कार्य केले ते निस्वार्थपणे.
नाहीतर हल्ली अनेक समाजसेवक असे आहेत की एखाद्याच १० रुपयाच काम केले की १०० रुपयाची जाहिरात करतात पण हा व्यक्ती १०० रुपयाच काम केल तरी १० रुपयाचीही जाहिरात करत नाही.
खरंतर अडलेल्या नडलेल्यांना,अडचणीत असलेल्यांना प्रत्यक्ष तिथे जाऊन मदत करुन त्यांना धिर देणारे एकमेव नेतृत्व म्हणजे एकनाथदादा.
हॉस्पिटल,पोलिस संबंधीत,प्रशासकिय ,
मंञालय,
कौटुंबिक व इतर कोणत्याही समस्येसाठी एकनाथदादा ओंबळे यांचा मोबाईल सुर्यास्तापासुन सुर्योदयापर्यंत सतत खणखणत असतो कारण या व्यक्तीकडुन आपलं काम होणार हे त्या लोकांना माहित असत त्यामुळे ते लोक हक्काने फोन करतात.व या लोकांच्या समस्येसाठी धावुन जातात.
सध्याच्या या युगात माणुस फक्त स्वत:चच हित पाहतो पण एकनाथदादा नामनिराळेच एखाद्याची समस्या सोडविण्यासाठी ते त्या व्यक्तीसाठी पुर्ण दिवस खर्च करुन त्या व्यक्तीची समस्या सोडवतात.
डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेऊन समाजकार्य करणाऱ्या एकनाथदादा ओंबळे यांनी उभ्या आयुष्यात मनुष्यधन कमवले.
समोरुन फोन आलेल्या व्यक्तीची समस्या जाणुन घेताना तो कोणत्या पक्षाचा,कोणत्या जातीचा याचा कधीच विचार केला नाही माणुसकी हाच एकमेव धर्म समजुन कार्य केले.
आपल्या प्रेमळ,निष्कलंक व निस्वार्थी स्वभावामुळे विरोधी पक्षातील लोकही त्यांचे चाहते आहेत.
पक्षासाठी ,समाजासाठी आजपर्यंत ३२ वर्षे निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या एकनाथदादा ओंबळे यांच्या कार्याची दखल पक्षाने घेतली पाहिजे व त्यांच्या बहुमान केला पाहिजे.
काही दिवसातच सरकारचे महामंडळ वाटप होत आहे त्यामध्ये एकनाथदादा ओंबळे यांना महामंडळ मिळावे हिच समस्त जावलीकरांची इच्छा आहे.
राजकिय इर्शेपोटी त्यांच्या या मार्गात अनेकजण काटे अंथरतीलही पण आजपर्यंत गोरगरिबांसाठी केलेले पुण्याच काम यामुळे देव त्या अंथरलेल्या काट्याच रुपांतर फुलांमध्ये करेल व एकनाथदादा ओंबळे या वाटेवरुन पुढे मार्गक्रमन करुन एका मोठया पदावर विराजमान होतील यात शंकाच नाही.
–एक सामान्य जावलीक


