डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सहाशे एक वृक्षांची वृक्ष लागवड!
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजसेवेचे व्रत अलौकिक:प्रांताधिकारी सोपान टोंपे.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सहाशे एक वृक्षांची वृक्ष लागवड!
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजसेवेचे व्रत अलौकिक:प्रांताधिकारी सोपान टोंपे.
सातारा.दि.८.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्यावतीने महाराष्ट्रभूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ पर्यावरणाचे रक्षण,संवर्धनासाठी पदमश्री सन्मानित महाराष्ट्रभूषण स्वच्छतादूत डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी,रायगडभूषण डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ८ जुलै रोजी महात्मा गांधी विद्यालय काले ता. कराड,पुसेसावळी ता.खटाव,मल्हारपेठ ता.पाटण आदी विविध ठिकाणी एकूण ६०१ वृक्षांची वृक्ष लागवड ४८६ सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.दरम्यान बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

मल्हारपेठ दुतर्फा रस्ता ता.पाटण वृक्षारोपणप्रसंगी माझी वसुंधरा शपथ घेवून पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी प्रतिष्ठानचा वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढ यांसारख्या विषयांवर उपाययोजना ठरणारा असल्याचे प्रतिपादन केले.दरम्यान तहसिलदार अनंत गुरव,गटविकास अधिकारी सरिता पवार,सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मचले,पाटण पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत,नारळवाडी सरपंच पंढरीनाथ चव्हाण,येराडवाडी सरपंच गोरखनाथ देसाई, मल्हार पेठ उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण,मल्हार पेठ ग्रामपंचायत सदस्य विद्या जाधव,शुभांगी कदम,सुनिता साठे,अनिता कदम,सुरेखा फल्ले, शुभांगी पानसकर,ग्रामसेवक प्रमोद ठोके, नारळवाडी-येराडवाडी ग्रामसेवक परमेश्वर पाखरे, पाटण शेती उत्पन्न बाजार समिती संचालक सुधाकर देसाई,पत्रकार योगेश हिरवे उपस्थित होते.

पुसेसावळी ता.खटाव बसस्थानक परिसरात वृक्षारोपणप्रसंगी वर्धन अॅग्रो चेअरमन माजी जिल्हाध्यक्ष भाजपचे धैर्यशीलदादा कदम यांनी प्रतिष्ठानचे कार्य सामाजिक,अध्यात्मिक क्षेत्रात फार मोठे असल्याचे सांगितले.दरम्यान माजी उपसरपंच सूर्यकांतबापू कदम,माजी सरपंच
दत्तात्रेय रुद्रुके,वडूज आगरप्रमुख
प्रताप पाटील,उपसरपंच दीप्तीताई कदम,
मुंबईचे माजी पोलीस निरीक्षक
अब्दुल बागवान,महात्मा गांधी विदयालयाचे चेअरमन श्रीकांततात्या कदम उपस्थित होते.
महात्मा गांधी विद्यालय काले ता.कराड वृक्षारोपणप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभागाचे सुप्रिया शिरगावे,सामाजिक वनीकरण कराडचे वनपाल प्रशांत मोहिते,तानाजी मोहिते,वनरक्षक मानसी निकम,सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती,सदस्य विकास पाटील,माता पालक संघ,शिक्षक पालक संघ,ग्रामस्थ उपस्थित होते.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तुकोबारायांच्या या वचनानुसार वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्वपुर्ण कार्य करीत असुन प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड,वृक्षसंवर्धन करून सामाजिक बांधिलकी जपण्यात येत आहे.मानवाला जगण्यासाठी प्राणवायु, अन्न,वस्त्र,निवारा,औषध,मुलभुत गरजांची उपलब्धता;पावसाला पृथ्वीकडे आकर्षित करण्याचे कार्य वृक्षच करतात.वृक्षांची संख्या कमी होत असल्याने मानवी जीवनावर दुष्परिणाम,ऋतुचकावर अनिष्ट परिणाम होऊन पाऊस नियमितपणे पडत नाही;काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती तर काही ठिकाणी नदयांना अचानक महापुर तसेच औष्णिकस्तर वाढू लागल्याने वृक्षारोपन,वृक्षसंवर्धन हे आपले उत्तरदायित्व आहे.यामुळे स्वयंस्फुर्तीने वृक्षलागवड करण्याचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातुन ठिकठिकाणी होत असुन समाजासमोर आदर्श उभा राहत आहे.
वृक्षारोपन करून विश्वसेवा,राष्ट्रसेवा,मानवजातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातुन अंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षलागवड महत्वाची आहे.वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संगोपन महत्वपुर्ण आहे.प्रतिष्ठानच्या माध्यमातुन जिल्ह्यात यापुर्वीच्या हजारो वृक्षांचे संगोपन अत्यंत नियोजनपुर्वक केले जात असुन या सामाजिक चळवळीत नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग आहे.
सुपारी,कदंब,कवट,सोनचाफा,बेल,बहावा, कांचन,आपटा,शमी,काजू,बकुळ,अर्जुन,आंबा, चिकू,पेरू,कढीपत्ता,लिंबू,रामफळ,सिताफळ,जांभूळ,कडुलिंब,गुलमोहर,पिलमोहर,पांढराचाफा
वड,पिंपळ,चिंच,आवळा,फणस,नारळ आदी विविधप्रकारची देशी,जंगली झाडे,फळझाडे लावून प्रतिष्ठानच्या माध्यमातुन संगोपन केले जाणार आहे.जिल्हाभर विविध ठिकाणी आपापल्या परिसरात सदस्यांकडून वृक्षारोपन करण्यात आले.वृक्ष लागवडचळवळीमध्ये पुसेगाव,वडूज, निमसोड,कोरेगाव,कराड,धोंडेवाडी,पाटण,नारळ वाडी,मारूलहवेली समर्थ बैठकीतील व परिसरातील सदस्य उपस्थित होते.
चौकट
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग यांच्यावतीने जिल्ह्यात गेल्या १७वर्षापासुन आत्तापर्यंत फळझाडे,औषधी वनस्पती,अशोक,सुरू,सिल्व्हा,वड,पिंपळ,आवळा,बेहडा आदीप्रकारांसह हजारो झाडांचे वृक्षारोपन करून प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे उत्तम संरक्षण,संवर्धन केले जात आहे.हजारो झाडे जगवून वृक्षारोपन केलेल्या ठिकाणी झाडे संबधितांकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया
प्रतिष्ठानचा वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रम स्तुत्य आहे.आजच्या वृक्षलागवडीमुळे मल्हारपेठ परिसराच्या सौंदर्यात वाढ होईल.ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ यांसारख्या विषयांवर ही उपाययोजना ठरेल.भारत सरकारच्या “एक पेड मा के नाम” या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम निश्चितपणे ठरेल.आपण ज्या वृक्षांची निवड केलेली आहे त्यामुळे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनादेखील याचा लाभ होईल.
सोपान टोंपे,प्रांताधिकारी पाटण
प्रतिक्रिया
वृक्षारोपण,वृक्षसंगोपनाचा उपक्रम उत्तम आहे.अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानिक फळे, फुलझाडांची लागवड झाली असून वृक्षारोपणाचे कार्य कौतुकास्पद आहे.अनेक समाजहितपयोगी उपक्रमांतुन समाजात जनजागृती होण्यास मदत होत आहे.
सुप्रिया शिरगावे,सहाय्यक वनसंरक्षक,सामाजिक वनीकरण विभाग,सातारा
प्रतिक्रिया
मल्हारपेठ परिसरात आजचा वृक्षलागवडीचा उपक्रम सध्याच्या पिढीला तसेच त्यानंतरच्या पिढीलादेखील महत्त्वपूर्ण आहे.आजच्या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांची पुण्यतिथी साजरी होत आहे आणि हीच त्यांना आदरांजली असेल.
सुरेश पानस्कर,पंचायत समिती सदस्य पाटण
प्रतिक्रिया
पाटण तालुक्याला निसर्गसौंदर्य लाभलेआहे. भागामध्ये संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे आणि तेच काम आज डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान करत असून हे खरंच कौतुकास्पद आहे.
अनंत गुरव,तहसिलदार,पाटण
प्रतिक्रिया
सामाजिक उपक्रमांमध्ये जडणघडण व त्याचा पाया खूप महत्त्वाचा ठरतो.आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हाच पाया समाजामध्ये घालून देतात ती खरंच उल्लेखनीय बाब आहे. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा.
सरिता पवार,गटविकास अधिकारी,पाटण
प्रतिक्रिया
अनेकविध समाजहितपयोगी उपक्रमातून समाजाला आदर्श घडवून दिला जात आहे.निरपेक्ष भूमिकेतून उपलब्ध मनुष्यबळ पाहता केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्षसंगोपन यंत्रणादेखील मजबुत आहे.
सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रात प्रतिष्ठानचे कार्य मोठे आहे.
धैर्यशील दादा कदम,वर्धन अॅग्रो, चेअरमन,माजी जिल्हाध्यक्ष भाजप सातारा
प्रतिक्रिया
प्रतिष्ठानचे कार्य देशासाठी कौतुकास्पद आहे
त्याचा आम्हाला स्वामिमान आहे.
अब्दुल बागवान,माजी पोलीस निरीक्षक,मुंबई
प्रतिक्रिया
प्रतिष्ठान तर्फे मानवताधर्माची जोपासना केली जाते.प्रतिष्ठानचे कार्य अलौकिक व वाखाणण्याजोगे असून गेल्या ८१ वर्षाहून अधिक काळ समाजाला मार्गदर्शन व दिशा देणारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
श्रीकांततात्या कदम,चेअरमन,महात्मा गांधी विद्यालय पुसेसावळी
प्रतिक्रिया
पर्यावरणास अनकुल वृक्षांचे वृक्षारोपण करून हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.
सुभाष पवार, मुख्याध्यापक ,महात्मा गांधी विदयालय,काले


