Uncategorized

अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी जावली तालुक्यातून कवी कट्टयासाठी कवी नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे यांची निवड.

अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी जावली तालुक्यातून कवी कट्टयासाठी कवी नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे यांची निवड.

कुसुंबी.दि.27.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी साहित्यिक आणि वाचकांसाठी आयोजित होणारा एक वार्षिक कार्यक्रम आहे, ज्याची सुरुवात १८७८ मध्ये न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. या संमेलनात मराठी भाषा आणि साहित्याविषयी चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जे साहित्याची परंपरा जपतात आणि आधुनिक आव्हानांवर विचार करतात. नुकतेच, ९८ वे संमेलन दिल्लीमध्ये (फेब्रुवारी २०२५) आणि ९९ वे संमेलन सातारा येथे (जानेवारी २०२6 मध्ये) आयोजित झाले आहे.

त्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनात प्रमुख आकर्षण असलेले व अनेक नवोदित म्हणा किंवा कवीना एक प्रमुख व्यासपीठ म्हणा उपलब्ध करून दिले जाते. त्या कवी कट्टया साठी
कवी नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे
कवी, लेखक, उत्कृष्ट कलाकार; आपल्या संवेदनशील काव्यलेखनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच प्रवासवर्णनातून प्रभावी शैलीने वाचकांना प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव देणारे, आमच्या मेढ्याचे सुपुत्र श्री नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे यांची
दिनांक १ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी जावली तालुक्यातून निवड झाली आहे. आपल्या कामाबरोबर साहित्याला देव समजल्या जाणाऱ्या प्रत्येकांसाठी ही अभिमानाची गोष्ट असते. त्यांच्या कवितेची निवड हा त्याचाच एक भाग आहे. आज खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणा किंवा कवी म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. जावली तालुक्यासारख्या दुर्गम भागातून अशी निवड झाल्याने एक नवा साहित्यिक या तालुक्याला म्हणा किंवा मेढ्याला मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button