सातारा-मेढा-महाबळेश्वर जिल्हामार्ग नामातंरण व किल्ले प्रतापगडावर छ. प्रतापसिंह महाराज यांचे स्मारक व्हावे.
श्रीमंत.छत्रपती.नामदार.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली -शिवक्रांती हिंदवी सेना.

सातारा-मेढा-महाबळेश्वर जिल्हामार्ग नामातंरण व किल्ले प्रतापगडावर छ. प्रतापसिंह महाराज यांचे स्मारक व्हावे.
श्रीमंत.छत्रपती.नामदार.शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली -शिवक्रांती हिंदवी सेना.
कुसुंबी.दि.२३.छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीय सत्तानांची धूळदाण करून स्मशान केलेल्या महाराष्ट्राचे आपल्या कर्तृत्वाने नंदनवन केले. रयतकल्याणाचा हाच वारसा छत्रपती घराण्याने आजही जपला आहे. त्यामुळे ज्या आद्य थोर समाजसुधारक श्रीमंत छत्रपती थोरले प्रतापसिंह महाराज यांचे कार्य जनमानसात येणे गरजेचे आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज म्हणजे शिवरायांची सावलीच होते. ते सत्यासाठी आणि रयतेसाठी बलिदान देणारे द्रष्टे राजे होते. ज्या थोरले श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी राजधानी सातारा मध्ये अभूतपूर्व सुविधा निर्माण केल्या, आजचा पुणे ते सातारा रस्ता आणि सातारा-मेढा-महाबळेश्वर प्रतापगड ते कोकण रस्ता तेव्हा निर्माण केला, लष्करी शाळा आणि रयत शिक्षणाचा आरंभ केला जगाला भुरळ पडणारे महाबळेश्वर शहर वसविले, एवढेच नव्हे तर आपली तुळजाभवानी शिवरायांनी स्थापिली आणि अफझल खानाचा वध केला तो श्री किल्ले प्रतापगड स्वराज्यात आणला असे कित्येक कार्य छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी केले आहे. आज खंत एकाच गोष्टीची आहे कि सह्याद्रीएवढे कार्य असणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे बाबत जनता अनभिज्ञ आहे. सदर निवेदनात आम्ही शिवकांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य आपणास सातारा- मेढा-महाबळेश्वर जिल्हामार्ग यास श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज असे नामांतरण करावे. त्याचप्रमाणे श्री किल्ले प्रतापगड येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराज यांचे स्मारक आणि कार्याचा आढावा देणारे फलक निर्माण करावे हि नम्र विनंती.
शिवराय आणि राजगादीचे पाईक म्हणून ही आमची विनंती मान्य व्हावी अन्यथा रीतसर आंदोलन करू-शिवक्रांती हिंदवी सेना.महाराष्ट्र राज्य

शिवक्रांती हिंदवी सेनेतर्फे निवेदन देताना संस्थेचे संस्थापक श्री. स्वप्निल धनावडे सर, उपाध्यक्ष प्रविण कदम, सचिव शशी चिकणे, जगन्नाथ शिंदे, आदित्य जाधव, प्रज्वल गायकवाड, जनाबाई शिंदे इत्यादी उपस्थित होते.




