Uncategorized

कास पठार हंगाम लवकरच एक सप्टेंबरला सुरू होणार…..

जागतिक वारसा स्थळ म्हणून विकसित असलेले कास पठार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण आहे,सर्वांचे सहकार्य व्हावे-उपवनसंरक्षक:अमोल सातपुते....

जागतिक वारसा स्थळ म्हणून विकसित असलेले कास पठार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण आहे,सर्वांचे सहकार्य व्हावे-उपवनसंरक्षक:अमोल सातपुते….

कास पठार हंगाम लवकरच एक सप्टेंबरला सुरू होणार…..

कास पठार सातारा.दि.२१. कास पठार म्हणून विकसित असलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असून त्याचा दर्जा अजून उंचविण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे, पर्यटकांचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी व्यक्त केले. कास पठार हंगामाच्या नियोजनाबाबत आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. हंगामाचे नियोजन करण्यासाठी सहा गावातील ग्रामस्थांची बैठक वनभवन सातारा या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, जावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गंबरे, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपाल राजाराम काशीद, उज्वला थोरात, वनरक्षक समाधान वाघमोडे, प्रकाश शिंदे, दत्तात्रेय हेर्लेकर, समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, उपाध्यक्ष प्रदीप कदम, सदस्य तानाजी आटाळे, संतोष आटाळे, ज्ञानेश्वर आखाडे,विजय वेंदे ,पांडुरंग शेलार, विठ्ठल कदम, दत्तात्रय बादापुरे तसेच ग्रामस्थ सोमनाथ जाधव, विष्णु कीर्दत, बजरंग कदम, बाजीराव चिकणे, मारुती चिकणे यांच्यासह सहा गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अमोल सातपुते म्हणाले, सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठारावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यामुळे कमीत कमी वाहने पठारावर येतील याची दक्षता घ्यावी. राजामार्गांवरून कुमुदिनी कडे जाण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा, या मार्गावर व्हिआयपी वाहने सोडू नयेत. कास पठार माहिती केंद्रासाठी लवकरात लवकर जागा निश्चित करण्यात येईल. पठारावर प्लास्टिकचा कचरा होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी तसेच इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर राजमार्गावरती करण्यात यावा. पर्यावरण पूरक पॅकिंग असलेल्या वस्तू पठारावर अथवा पार्किंग मध्ये विक्रीसाठी ठेवाव्यात. तसेच कास पठाराची कुठेही बदनामी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, काही तक्रारी असतील तर तक्रार निवारी निवारण समिती स्थापन करून तक्रारींवर मार्ग काढण्यात येईल.

ठळक मुद्दे
१) सहा गावातील व्यवसायिकांनी तसेच बैलगाडी धारकांनी तीन दिवसात समिती कार्यालयात अर्ज करावेत.
२) स्वयंसेवकांच्या मानधनात 25 टक्के वाढ केली जाईल.

३) सुट्टीच्या दिवशी पठारावर फक्त ऑनलाइन बुकिंग करणारांनाच प्रथम प्रवेश, ऑफलाईनल येणाऱ्या पर्यटकांना दुप्पट प्रवेश शुल्क आकारले जाईल.

४) वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्यात येईल.
५) कास समितीने कुठलेही काम करताना वनविभागाची परवानगी आवश्यक आहे.
६)कार्यरत स्वयंसेवकाडून गैरवर्तन झाल्यास त्याची गय केली जाणार नाही.
७) प्लास्टिकमुक्त कास पठारासाठी पुढाकार घ्यावा तशी उपयोजना करावी.
८) शनिवार, रविवार व शासकीय सुट्यांदिवशी कास, घाटाई मार्गे अंधारी, कोळघर ते सह्याद्रीनगर वरून सातारा व मेढा असा एकेरी वाहतूक मार्ग करण्यात येईल.
९) कास पठारावर व वनविभागाच्या हद्दीत खाजगी स्टाॅल धारकांना परवानगी नाही याची दक्षता घ्यावी.
१०) सहा गावातील मध, तांदूळ, नाचणी ,ई स्थानिकांना प्रथम प्राधान्य त्यांचे पदार्थ विक्रीसाठी ठेवणार.

चौकट – मुसळधार पाऊस व शासकीय दुर्लक्षामुळे कास पठारावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून हा रस्ता दुरूस्त करावयाच्या सूचना समितीला दिल्या असल्या तरी हा रस्त्याची दुरवस्था बघता हे काम आवाक्याच्या बाहेरचे ठरणार आहे. यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.

फोटो – सातारा – कास पठाराच्या हंगामाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत उपस्थित वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थ, संचालक मंडळ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button